श्रीविद्या बालक मंदिर प्रा. शाळा
लहान वयात केलेले योग्य संस्कार घडवितात उज्वल भविष्य
श्रीविद्या संस्था
Years of Success
स्थापना : औरंगाबादमधील शैक्षणिक विकासांतर्गतच १९९४ साली ‘सौभद्र शिक्षण प्रसारक मंडळाची’ स्थापना झाली. त्याअंतर्गत १९९५ पासून उल्कानगरी परिसरामध्ये श्रीविद्या बालक मंदिरची सुरुवात झाली. नैसर्गिक वाढीनुसार खेळवाडी, शिशुवर्ग, बालवर्ग अशा उपक्रमांद्वारे शैक्षणिक श्रीगणेशा करून १९९८ मध्ये संस्थेने इयत्ता चौथी पर्यंत शिक्षणाची सोय उपलब्ध केली.
शालेय वार्ता
शालेय उपक्रम
बालकांच्या संस्कारक्षम वयात शिक्षण आणि आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. यासाठी श्रीविद्या शाळेने हा अभिनव उपक्रम आयोजित केला आहे.
या उपक्रमात पाल्यासह त्यांचे पालकही सहभागी होणार असल्याने त्यांच्यातील भावबंध आणखी दृढ होतील. आपले आई-बाबा आपल्यासाठी एवढा वेळ देत आहेत, हे बालकांसाठी आनंदाची पर्वणी ठरेल याची आम्हाला खात्री आहे.

प्रवेश प्रक्रिया
आमच्या शाळेत प्रवेश घेण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आणि पारदर्शक व्यवहाराची आहे. शाळेत विद्यार्थ्याच्या प्रवेशप्रक्रियेसाठी आलेल्या पालकांना योग्य ते मार्गदर्शन केले जाते. त्यांच्या सर्व शंकांचे निरसन केले जाते. प्रवेशासाठीचा वयोगट खालीलप्रमाणे आहे.
खेळवाडी – ३ ते ४ वर्षे.
शिशुवर्ग- ४ ते ५ वर्षे.
बालवर्ग – ५ ते ६ वर्षे.
इयत्ता पहिली – ६ वर्षे पूर्ण.
संपर्क क्रमांक
Tel: 898-390-2274
शाळेचा पत्ता
श्रीविद्या बालक मंदिर प्राथमिक शाळा,१५६, सुखशांती, उल्कानगरी, औरंगाबाद