top of page
श्रीविद्या बालक मंदिर प्रा. शाळा


Headteacher's Note

श्रीविद्या ही एक अशी शाळा आहे, की जिथे ‘विद्यार्थी’ हा केंद्रस्थानी आहे. इथे विद्यार्थी, पालक, शिक्षक, आणि सेवकवर्ग हे सर्व एका विशिष्ट सद्हेतूने कार्य करत असतात. प्रत्येक विद्यार्थी सुजाण, आपले आई-वडील, आपली मातृभूमी, आणि निसर्गाच्या ऋणात राहणारा नागरिक बनावा, हेच आमचे ध्येय आहे.
भक्कम इमारत उभी करायची, तर पायाही तितकाच भक्कम हवा. त्याचप्रमाणे सद्वर्तनी, सद्गुणी व्यक्ती घडायला हवी असेल, तर लहान वयातच मुलांवर तसे संस्कार करायला हवेत. आमचा विद्यार्थी चांगले आणि वाईट यातला फरक ओळखू शकतो, आत्मविश्वासू, स्वावलंबी, संवेदनशील मनाचा पण तितकाच खंबीर असतो. जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी भारतीय नीतीमुल्ये जपतो, कारण शालेय जीवनात त्याच्यावर अगदी सुयोग्य संस्कार झालेले असतात.
आम्हाला सांगायला खूप अभिमान वाटतो की, श्रीविद्या शाळेला विद्या प्रतिष्ठान या संस्थेतर्फे सतत तीन वर्षे ‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा व उपक्रमशील शाळा’ हा पुरस्कार मिळाला आहे.
आम्हाला सा ंगायला खूप अभिमान वाटतो की, श्रीविद्या शाळेला विद्या प्रतिष्ठान या संस्थेतर्फे सतत तीन वर्षे ‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा व उपक्रमशील शाळा’ हा पुरस्कार मिळाला आहे.

bottom of page