श्रीविद्या बालक मंदिर प्रा. शाळा
Field Trips
The experience is important in developing student's future.
बालवाडी विभाग : दोन्ही सत्रात एक याप्रमाणे प्रत्येक शैक्षणिक वर्षात दोन
सहलींचे आयोजन करण्यात येते.
प्राथमिक विभाग : प्रत्येक महिन्यात पहिली ते चौथीच्या प्रत्येक वर्गाच्या
विद्यार्थ्यांसाठी एका शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जाते. प्रत्येक वर्गाच्या
सहलीचे ठिकाण हे वेगवेगळे असते. यात काही सहली निसर्गरम्य ठिकाणी
असतात. उद्योजकीय मन तयार व्हावे आणि श्रमाचे महत्व विद्यार्थ्यांना
कळावे म्हणून काही सहली प्रोडक्शनच्या ठिकाणी (कारखाना), तर काही
सहली विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडेल अशा ठिकाणी (रक्तपेढी, नर्सरी)
नेण्यात येतात. त्यामुळे बालवाडी ते इयत्ता चौथी या वर्षांमध्ये
विद्यार्थी शिकत असताना त्याला अनेक क्षेत्रांची, तिथे चालणाऱ्या कामाची
प्रत्यक्ष माहिती मिळते.
निवासी सहल : दरवर्षी इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांची श्रीक्षेत्र शेगाव येथे
दोन दिवसांची निवासी सहल आयोजित करण्यात येते. या सहलीमुळे विद्यार्थी
जबाबदारी, निर्भयपणा, स्वावलंबन, आणि संघटन हे गुण आत्मसात करतात.