top of page

Our Staff

आमच्या शाळेतील शिक्षक वृंद हा प्रत्येक विद्यार्थ्याशी अतिशय आत्मीयतेने गुरु-शिष्याचे नाते निर्माण करतात. प्रत्येक विद्यार्थी हा वेगळ्या क्षमता घेऊन आलेला असतो, हे ते जाणतात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये असलेले सद्गुण वृद्धिंगत करण्यासाठी, त्यांचा बौद्धिक, भावनिक, शारीरिक विकास करण्यासाठी ते विशेष प्रयत्न करतात.

विद्यार्थी घडविण्यात वर्गखोली नाही, तर शिक्षक हे महत्वाची भूमिका निभावत असतात.

 माध्यम : “मातृभाषेतील शिक्षण हे सर्वश्रेष्ठ शिक्षण होय” या शिक्षणतज्ञांच्या मतानुसार संस्था बालवाडी विभागात मराठी भाषेतून शिक्षण देते. पण मुलांना इंग्रजीची ओळख व्हावी, मुलांचा इंग्रजी शब्दसंग्रह वाढावा, त्यांचा इंग्रजीबद्दल आत्मविश्वास वाढावा या हेतूने २००८-९ या शैक्षणिक वर्षापासून शाळेत प्राथमिक विभागात सेमी इंग्रजी माध्यम सुरु करण्यात आले आहे. यात विज्ञान व गणित हे विषय इंग्रजी भाषेतून शिकविण्यात येतात. त्यासाठी शिक्षिकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच बालवाडीपासून ‘संस्कृत’ हा विषय देखील शिकविला जातो.

Shrividya logo
bottom of page