top of page
श्रीविद्या बालक मंदिर प्रा. शाळा
History
स्थापना : औरंगाबादमधील शैक्षणिक विकासांतर्गतच १९९४ साली ‘सौभद्र शिक्षण प्रसारक मंडळाची’ स्थापना झाली. त्याअंतर्गत १९९५ पासून उल्कानगरी परिसरामध्ये श्रीविद्या बालक मंदिरची सुरुवात झाली. नैसर्गिक वाढीनुसार खेळवाडी, शिशुवर्ग, बालवर्ग अशा उपक्रमांद्वारे शैक्षणिक श्रीगणेशा करून १९९८ मध्ये संस्थेने इयत्ता चौथी पर्यंत शिक्षणाची सोय उपलब्ध केली.
"यंत्र नव्हे, व्यक्ती घडविणारी शाळा !"
विद्यार्थ्यांमध्ये सुरुवातीपासूनच संस्कार, भारतीय मुल्ये, पर्यावरणपूरक भावना त्यांच्या मनामध्ये रुजवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. स्वावलंबन, स्वयंशिस्त, स्वच्छता हे गुण त्यांच्या अंगी यावेत, म्हणून प्रयत्न करतो. अभ्यासक्रमातील मुलभूत संकल्पना स्पष्ट व्हाव्यात, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न करतो.
bottom of page