श्रीविद्या बालक मंदिर प्रा. शाळा
स्नेहसंमेलन
The experience is important in developing student's future.
स्नेहसंमेलन म्हणजे शालेय जीवनातील अत्यंत आनंदाचे क्षण !
विद्यार्थ्यांमधील कलागुणांना मिळणारे हक्काचे व्यासपीठ. ही आनंदाची पर्वणी
म्हणजे जणू ‘चेरी ऑन आईस्क्रिमच’. शाळाप्रशासन, विद्यार्थी आणि पालक
या सर्वांच्या सहकार्याने तयार झालेला कार्यक्रम.
बालवाडी विभाग आणि प्राथमिक विभाग अशा दोन विभागात हे
स्नेहसंमेलन साजरे होते. प्रत्येक विद्यार्थ्यांला यात सहभागी करून घेतले
जाते. गाण्यांची निवड सुध्दा त्यांच्या वयाला साजेशीच असते. या दोन्ही
सांस्कृतिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन इयत्ता चौथीचे विद्यार्थी करतात.
आधीच्या वर्षातील शाळेचे माजी गुणवंत विद्यार्थी या कार्यक्रमाचे प्रमुख
पाहुणे असतात. त्यांच्याच हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होते. माजी गुणवंत
विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात शाळेतर्फे बक्षिसे देण्यात येतात.