श्रीविद्या शाळेचे स्नेहसंमेलन जल्लोषात साजरे
- jaymini.shrividya

- Mar 16, 2019
- 1 min read
स्नेहसंमेलन म्हणजे आनंदोत्सव... ! विद्यार्थी, शिक्षिका, पालक सगळेच स्नेहसंमेलनाची अगदी आतुरतेने वाट बघत असतात. स्नेहसंमेलन म्हणजे सर्व शालेय उपक्रमांमधील चेरी ऑन आइस्क्रीमच...!!
यावर्षी शाळेचे स्नेहसंमेलन दि.१२ मार्च रोजी संत तुकाराम नाट्यगृह, सिडको येथे आनंदात संपन्न झाले.
प्रतिवर्षीप्रमाणेच स्नेहसंमेलनाचे उदघाटन शाळेच्या माजी गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले.
इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी श्रीगणेशाच्या आराधनेने कार्यक्रमाची सुरुवात केली. बालवाडी विभागाच्या विद्यार्थ्यांनीसुद्धा अतिशय उत्साहात विविध गीतांवर नृत्ये सादर केली.
प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांची नृत्यातील समज बघून प्रेक्षक भारावून गेले. देवीचा गोंधळ, धनगरगीत, शेतकरी नृत्य, शिवबा मल्हारी, भक्तीगीत अशा अनेक नृत्यप्रकार सादर करण्यात आले.
याप्रसंगी शाळेचे श्री.महेश अष्टपुत्रे सर यांनी शाळेच्या विविध उपक्रमांबद्दल माहिती दिली.
स्नेहसंमेलनात मागील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच आदिती पडोळ मॅडम, अर्चना मंत्री मॅडम, प्रणिता पिंपळे मॅडम, मंजिरी आंबिलवादे, रेखा बारहाते मॅडम, अर्चना सांगरोळकर मॅडम, श्री.मोदाळे सर यांचा त्यांच्या कार्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
शाळेच्या मुख्याध्यापिका नीला अष्टपुत्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले.



Comments