श्रीविद्या प्राथमिक शाळेत वक्तृत्व स्पर्धा संपन्न
- jaymini.shrividya

- Aug 2, 2019
- 1 min read

उल्कानगरी येथील श्रीविद्या प्राथमिक शाळेतर्फे दरवर्षी स्व. मुग्धा मिरजगांवकर स्मृतीप्रित्यर्थ वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येते. यावर्षीही ही स्पर्धा
दि. १/८/१९ रोजी उत्साहात पार पडली.
या वर्षी या स्पर्धेत १७ शाळांमधील ३४ विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता. भाषणासाठी विषय होते, माझ्या स्वप्नातील भारत, माझ्या स्वप्नातील शाळा, किंवा माझ्या स्वप्नातील घर. यांपैकी कोणत्याही एका विषयावर विद्यार्थ्यांना भाषण करावयाचे होते. विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहात आपले मनोगत व्यक्त केले.
या स्पर्धेत पुढील स्पर्धक विजयी झाले आहेत. :
प्रथम क्रमांक :- अस्मिता अतुल पारवेकर (मुकुल मंदिर शाळा)
द्वितीय क्रमांक :- स्नेहल बालाजी मुंढे (मुकुल मंदिर शाळा)
तृतीय क्रमांक :- मानसी रमेश वाकडे (शारदा मंदिर प्राथमिक शाळा)
उत्तेजनार्थ :- शर्वरी रवींद्र भगत (मॉन्टेसरी बालक मंदिर)
सर्व विजयी स्पर्धकांचे अभिनंदन. या स्पर्धेच्या परीक्षणाचे काम डॉ.सौ.वीणा क्षीरसागर आणि अॅड. सौ. सई चपळगावकर यांनी पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका कीर्ती पुंडे यांनी तर आभार प्रदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका नीला अष्टपुत्रे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेच्या सर्व शिक्षिकांनी परिश्रम घेतले.



Comments