Search
रौप्य महोत्स
- jaymini.shrividya

- Dec 27, 2019
- 1 min read
२०१९-२० हे शाळेचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्ताने दि.२५/१२/१९ रोजी इयत्ता पाचवी ते दहावीत शिकत असलेल्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांसाठी स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता.
अगदी उत्साहाने जवळपास तीनशे माजी विद्यार्थी शाळेत आले होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्याध्यापिका नीला अष्टपुत्रे मॅडमने प्रास्ताविक केले. संस्थेचे श्री.महेश अष्टपुत्रे यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.
अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना शाळेत आणून सोडणाऱ्या व्हॅनवाल्या काकांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला. नंतर सर्वांनी अल्पोपहाराचा आस्वाद घेतला. सगळाच कार्यक्रम खूपच उत्कृष्ट झाला.

















Comments