बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम .....
- jaymini.shrividya

- Jul 16, 2019
- 1 min read
श्रीविद्या बालक मंदिर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची एकादशी निमित्त दिंडी नेण्यात आली. उल्कानगरीच्या विठ्ठल मंदिरात ही दिंडी नेण्यात आली. शाळेच्या बालवाडी विभागाची दिंडी सकाळी नेण्यात आली. छोटे छोटे विद्यार्थी वारकर्यांच्या वेषात नटून आले होते. हातात टाळ, गळ्यात तुळशीची माळ, मुलींच्या डोक्यावर तुळस आणि मुखी हरिनामाचा जयघोष अशा भक्तिपूर्ण वातावरणात दिंडी निघाली.
प्राथमिक विभागाची दिंडी दुपारी नेण्यात आली. या विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसत होता. लेझीम खेळत, टाळ वाजवत, शाळेपासून मंदिरात जाईपर्यंत त्यांनी विठुरायाच्या गजराने सगळा परिसरच भक्तिरसाने भारून टाकला. अतिशय शिस्तीत विद्यार्थ्यांनी विठोबा-रखुमाईचे दर्शन घेतले. तिथे उपस्थित असलेल्या इतरांनाही मुलांच्या शिस्तीचे खूप कौतुक वाटले. परत येताना शाळेजवळ मुलीनी फुगड्या खेळल्या, फेर धरला. अशाप्रकारे अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात दिंडी संपन्न झाली. सर्व विद्यार्थ्यांना शाळेतर्फे प्रसादवाटप करण्यात आले.
शाळेच्या मुख्याध्यापिका नीला अष्टपुत्रे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेच्या सर्व शिक्षिकांनी प्रयत्न केले.













Comments