Search
पर्यावर्णपुरक उपक्रम
- jaymini.shrividya

- Nov 18, 2019
- 1 min read
श्रीविद्या शाळा नेहमीच पर्यावर्णपुरक उपक्रम राबवत असते. कापडी पिशव्या वाटप, निर्माल्यापासून खतनिर्मिती, टाकाऊतून टिकाऊ, विद्यार्थ्यांना कागदी बॅग्ज आणि आकाशकंदील तयार करायला शिकवणे, शाडू-मातीची श्रीगणेशमूर्ती तयार करायला शिकवणे... असे अनेक उपक्रम शाळेत घेतले जातात.
याच अनुषंगाने शाळेत एक अभिनव उपक्रम घेण्यात आला. शिसपेन्सिली तयार करतांना त्याचे शिसे लाकडी आवरणात बसवले जाते. पण यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते. तर हे शिसे कागदी रद्दीच्या आवरणात बसवलेल्या पेन्सिलींविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगण्यात आली. या पेन्सिली कशा तयार करतात, हे समजवण्यात आले. आणि दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी आणलेल्या वर्तमानपत्राच्या रद्दीच्या बदल्यात पर्यावरणपुरक पेन्सिलींचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात यामुळे मोलाची भर पडली.









Comments