Search
पोस्टऑफिसला भेट....
- jaymini.shrividya

- Feb 9, 2019
- 1 min read
दि. ८/२/१९ रोजी इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांची सहल 'मुख्य पोस्ट ऑफिस, शहागंज' येथे नेण्यात आली.
पोस्टाचे कामकाज कसे चालते, हे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कळावे, या हेतूने ही सहल नेण्यात आली. तेथे पत्राचा प्रवास कसा होतो, मनीऑर्डर करणे, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक, पोस्टाची तिकिटे, या सगळ्या गोष्टींची प्रत्यक्ष माहिती देण्यात आली.
फोन, फेसबुक, व्हॉट्सअपच्या आजच्या काळात पत्र लिहिणे थोडे मागे पडले आहे. तरीही पोस्टकार्ड, आंतरदेशीय कार्ड, पाकीट या वस्तू विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दाखवून त्याबद्दल माहिती देण्यात आली.









Comments