प्रजासत्ताक दिन
- Swati DESHMUKh
- Feb 1, 2019
- 1 min read
Updated: Feb 6, 2019
दि.२६ जानेवारी २०१९ रोजी शाळेत प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. श्री.महेश अष्टपुत्रे यांनी ध्वजारोहण केले. राष्ट्रगीत म्हणून सर्वांनी ध्वजाला मानवंदना दिली.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी प्रार्थना, देशभक्तीपर गीते तसेच आठ विविध भाषेतून प्रतिज्ञा म्हटली. विद्यार्थ्यांना सप्टेंबर, ऑक्टोबर, आणि डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या वर्गस्पर्धांची बक्षिसे देण्यात आली.
यादिवशी इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी 'सूर... ताल... लयदार पाढे' हा आगळावेगळा उपक्रम सादर केला. यात त्यांनी दोन ते वीसचे पाढे ताल-सुरात आणि नृत्याच्या आधारे सादर केले. या उपक्रमाचे सर्वांनीच कौतुक केले.
इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध कलात्मक वस्तूंचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते, ज्याचा विद्यार्थ्यांसह पालकांनीही आनंद घेतला.



Comments