गोविंदा आला रे आला .......
- jaymini.shrividya

- Aug 27, 2019
- 1 min read
श्रीविद्या प्राथमिक शाळेच्या बालवाडी व प्राथमिक विभागात दि.२४ ऑगस्ट रोजी गोपाळकाल्यानिमित्य दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
शाळेच्या आवारात दहीहंडी बांधण्यात आली होती. सगळे विद्यार्थी-विद्यार्थिनी गोपालकृष्णाच्या, राधेच्या किवा गोप-गोपिकांच्या विविध वेशभूषेत नटून-थटून आले होते. विद्यार्थ्यांनी ‘गोविंदा रे गोपाला’ अशा गोविंदा गीतांवर नृत्याचा ठेका धरला.
विद्यार्थ्यांचा उत्साहाला अगदी उधाण आले होते. त्यानंतर अतिशय उत्साहात दहीहंडी फोडण्यात आली. नंतर पोहे, चुरमुरे, लाह्या या सर्व पदार्थांचा गोपाळकाला तयार केला . अतिशय पारंपारिक पण पौष्टिक असलेल्या या पदार्थातील घटकांचे आपल्या शरीरासाठी असणारे महत्व मुलांना समजावून सांगण्यात आले. नंतर विद्यार्थ्यांना गोपाळकाल्याचा प्रसाद देण्यात आला.
शाळेच्या मुख्याध्यापिका नीला अष्टपुत्रे आणि इतर सर्व शिक्षिका यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.









Comments