किड्स मॅरेथॉन 2019
- Swati DESHMUKh
- Feb 4, 2019
- 1 min read
Updated: Feb 5, 2019

दि.३ फेब्रुवारी रोजी श्रीविद्या प्राथमिक शाळा आणि तेजस्विनी ग्रुप यांनी एकत्रितपणे 'Run For Health And Education' ही संकल्पना ठेवून या मॅरॅथॉनचे आयोजन केले होते. सहा वय वर्षांपर्यंतच्या ऐंशी मुला-मुलींनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला होता.
श्री गजानन महाराज मंदिर ते व्यंकटेश मंगल कार्यालय या मार्गावरून सकाळी सात वाजता ही मॅरेथॉन घेण्यात आली. ही छोटी बच्चेकंपनी आपल्या पालकांसह या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाली होती.
अगदी दहाच मिनिटांत त्यांनी हे अंतर पार केले. प्रत्येक सहभागी मुलांना मेडल्स आणि अनेक आकर्षक बक्षिसे देण्यात आली. तसेच त्यांना त्यांच्या पालकांसह नाश्ताही देण्यात आला.
'मूल घडवतांना पालकांची भूमिका' या विषयावर शाळेच्या मुख्याध्यापिका नीला अष्टपुत्रे यांनी याप्रसंगी पालकांना मार्गदर्शन केले.
मॅरेथॉनच्या निमित्ताने सहभागी मुलांना काही वेळ आपल्या आई-बाबांच्या सहवासात राहता आले. आपण आपल्या आई-बाबांसाठी सर्वात महत्वाचे आहोत, ते खास आपल्यासाठी वेळ देऊ शकतात ही भावना या मुलांच्या मनात रुजली, हे या कार्यक्रमाचे मोठे यश म्हणावे लागेल.















Comments