Search
llरौप्य महोत्सll
- jaymini.shrividya

- Jun 7, 2019
- 1 min read

ll नमस्कार ll
श्रीविद्या शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षात आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत...!!
अर्थातच शाळेने ही जी २५ वर्षं यशस्वीरीत्या पूर्ण केली आहेत, या यशात शाळेच्या प्रशासनाबरोबरच शाळेचे सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचाही तितकाच सहभाग आहे. म्हणून शाळेतर्फे आपणा सर्वांचे अभिनंदन !!
आज गुरुपुष्यामृत योग आहे. तसेच पराक्रमी 'महाराणा प्रताप यांची जयंती' आणि महाराष्ट्राची अस्मिता असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा 'राज्याभिषेक दिन' आहे. अशा या शुभदिवशी २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी बालवाडी विभागाची शाळा आजपासून सुरु होत आहे.
या चिमुकल्यांचा आज 'शाळेचा पहिला दिवस' अत्यंत आनंदात, उत्सुकतेत आणि उत्साहात साजरा झाला.



Comments