*सुट्टीतील गृहपाठ*
## सुट्टीत तुमच्या मुलांना भरपूर मैदानी खेळ खेळू द्या. खेळतांना त्यांना थोडीफार इजा झाली, तरी काळजी करू नका. त्यांच्या शारीरिक निकोप वाढीसाठी हे आवश्यक आहे.
## मुलांना कुत्रा, मांजर असा एखादा प्राणी पाळू द्या. त्यामुळे त्यांचे मन संवेदनशील होण्यास मदत होईल.
## त्यांना काही लोकसंगीत ऐकवा.
## मुलांना वाचण्यासाठी रंगीत चित्रं असणारी गोष्टींची पुस्तके घेऊन द्या.
## तुमच्या मुलांना टीव्ही, मोबाइल, कॉम्प्युटर अशा इलेक्ट्रॉनिक साधनांपासून दूर ठेवा.
## मुलांना कॅडबरी, चॉकलेट, चिप्स, बेकरी ऍटम असे आरोग्यासाठी अयोग्य पदार्थ जास्त देऊ नका.
## तुमच्या मुलांच्या डोळ्यात बघा, की देवाने तुम्हाला इतके मौल्यवान मूल दिले आहे त्याबद्दल देवाचे आभार माना.
***********
पालक म्हणून आपल्या पाल्याला आपला वेळ देणे हे सर्वात महत्वाचे आहे.
Recent Posts
See AllShrividya had arranged sport day on 24th and 25th of December. The result of the pre-primary section is as follows. Khelwadi *Running...
コメント