रौप्य महोत्सव

चला,
पुन्हा जाऊ आपल्या जुन्या शाळेत... आपल्या वर्गात...
बसून बघूया आपल्या बेंचवर...
राष्ट्रगीत, प्रार्थना, प्रतिज्ञा म्हणूया...
थोडी मजा, मस्तीही करूया...
मित्र-मैत्रिणींशी भरपूर गप्पा मारुया...
आपल्या व्हॅन काकांनाही भेटूया...
आणि
भेटूया आपल्या गुरुजनांना...
आपला एक दिवस करूया संस्मरणीय...
नमस्कार!!
२०१९-२०२० हे शैक्षणिक वर्ष श्रीविद्या बालक मंदिर, प्राथमिक शाळेचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे, ही आपल्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे.
रौप्य महोत्सवी वर्षानिमित्य माजी विद्यार्थ्यांसाठी स्नेहमेळावा आयोजित केला आहे.
◆इयत्ता पाचवी ते दहावीत शिकत असलेल्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांसाठी--
दि. २५/१२/१९ (बुधवार)
वेळ दुपारी १२:३० ते ४:००
(शाळेच्या प्रांगणात)
आणि
◆इयत्ता दहावीच्या पुढील शाळेच्या माजी विद्यार्थ्यांसाठी--
दि. २९/१२/१९ (रविवार)
वेळ दुपारी ३:०० ते ७:००
(शाळेच्या प्रांगणात)
जे विद्यार्थी या कार्यक्रमाला येऊ इच्छितात, त्यांनी आपले कन्फर्मेशन फोनवर शाळेला जरूर कळवावे. म्हणजे आम्हाला सगळ्या कार्यक्रमाची आखणी करणे सोयीचे होईल.
या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी -- https://www.shrividyaschool.org/alumni-registration
-- या शाळेच्या वेबसाइटला भेट देऊन लवकरात लवकर आपले रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे.
नक्की या, आम्हीही आपणा सर्वांना भेटण्यास उत्सुक आहोत.
फोन क्र.९३२५९२४६९४
Recent Posts
See AllShrividya had arranged sport day on 24th and 25th of December. The result of the pre-primary section is as follows. Khelwadi *Running Race* 1st- Ansh Pawar 2nd-Vihan Kadam 3rd-Purvansh Kurdukar *Bowli