top of page

Gudhipadva Special

नमस्कार.

सर्वांना गुढीपाडवा आणि नूतन वर्षाच्या आनंददायी, आरोग्यदायी शुभेच्छा !
         दरवर्षी शाळेत गुढीपाडवा ते रामनवमी या कालावधीमध्ये सर्व विद्यार्थी आणि शिक्षक श्रीरामरक्षेचे पुरश्चरण करतात.
         प्रतिपदेपासून म्हणजे आजपासून रामनवमी पर्यंत रोज एका ठराविक वेळेस आणि ठराविक ठिकाणी किंवा देवघरासमोर बसून १२ वेळा रामरक्षा स्तोत्र मोठ्याने पठण करावी.  पहिल्या दिवशी फलश्रुतीसह पूर्ण रामरक्षा म्हणून सुरूवात करावी.नंतर १० वेळा श्लोक ४ ते १० म्हणावेत आणि शेवटी पूर्ण रामरक्षा म्हणावी. असे रोज पठण करावे. रामनवमीच्या दिवशी वरीलप्रमाणेच आवर्तन करावे. अशी हे पुरश्चरण करण्याची पद्धत आहे.
          श्रीरामरक्षेचे पुरश्चरण केल्याने एक प्रकारची शक्ती किंवा सकारात्मकता आपल्या मनात निर्माण होते. तसेच संस्कृत भाषेमुळे उच्चार स्पष्ट होण्यास, भाषा शुद्ध होण्यास आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
         यावर्षी शासनाच्या निर्णयाप्रमाणे शाळेला सध्या सुट्टी असली तरीही हे श्रीरामरक्षेचे पुरश्चरण पूर्ण व्हावे, असे आम्हाला वाटते.
       त्यानुसार वेबसाइटवर श्रीरामरक्षेच्या पुरश्चरणाची ऑडिओ क्लिप अपलोड करत आहोत. आपण इतकेच करावयाचे आहे की, रोज संध्याकाळी सहा वाजता आपण आपापल्या घरीच ही ऑडिओ क्लिप आपल्या पाल्यांसह ऐकावी. शक्य झाल्यास आपणही श्रीरामरक्षा म्हणावी. आमच्या प्रत्येक विद्यार्थ्यांभोवती हे श्रीरामरक्षेचे कवच असावे, असं वाटते म्हणून हा उपक्रम घेत आहोत.
           यामुळे एक सामुदायिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल, ज्याची सध्या नितांत आवश्यकता आहे.
           धन्यवाद

Day 9

Ram RakshaArtist Name
00:00 / 37:20
Shrividya logo
bottom of page